Dighi News: रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – नवविकास तरुण मित्र मंडळ व रुबी हॉल क्लिनीक पुणे यांच्या वतीने  प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित  भव्य रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.  250 जणांनी रक्तदान केले. दिघीतील सर्व्हे नंबर 2 होराईझन स्कुल येथे बुधवारी (दि.26) सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले.

भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, दिघीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप शिंदे, इ प्रभाग समितीचे सभापती विकास डोळस, नगरसेविका सोनाली गव्हाणे नगरसेवक संतोष मोरे, भाजपचे चिटणीस कुलदिप परांडे, विनायक मोरे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या तिस-या लाटेत रक्ताचा पुन्हा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक रक्तपेढीत रक्तसाठा कमी आहे. त्यामुळे रक्ताची आवश्यकता भासत आहे. रक्ताचा तुटवडा जाणवू यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. 250 हून अधिक जणांनी रक्तदान केले असल्याचे नगरसेवक विकास डोळस यांनी सांगितले. प्रत्येक रक्तदात्यास सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आल्याचे भाजपचे चिटणीस कुलदिप परांडे यांनी सांगितले.

रक्तदान शिबिराच्या आयोजनात विघ्नराजेंद्र सार्वजनिक गणेश मंदिर, संकल्पना प्रतिष्ठाण, कपिल वस्तू बुद्ध विहार, संघर्ष स्पोर्टस् क्लब, शिवमुद्रा मित्र मंडळ, सर्व-धर्म समभाव प्रतिष्ठाण, आरडी बॉईज् यांनी पुढाकार घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.