Corona Test News : शहरातील चाचणी केंद्रांमध्ये  वाढ; आता 10 ठिकाणी दिवसभर होणार कोरोना चाचणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना चाचणी केंद्रांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार आता शहरातील 10 केंद्रांवर दिवसभर कोरोनाची रॅपिड अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून चाचण्या करण्यास सुरुवात केली जाणार आहे. प्रत्येक केंद्राच्या वेळा निश्चित केल्या आहेत. यापूर्वी फक्त तीन केंद्रांवर दिवसभर चाचणी केली जात होती.

‘या’ केंद्रांवर होणार कोरोना चाचणी

संभाजीनगर -बीएसएनएल आरटीटीसी सेंटर : सकाळी 9 ते रात्री 9

तानाजीनगर -चिंचवडगाव तालेरा रुग्णालय : सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत

संत तुकारामनगर-यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) : सकाळी 8 ते रात्री 8

खराळवाडी-बालभवन : सकाळी 9 ते दुपारी 3.30

पिंपरी कॅम्प- जुने जिजामाता रुग्णालय : सकाळी 8 ते रात्री 8

पीसीएमटी चौक- भोसरी रुग्णालय : सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत

निगडी- यमुनानगर रुग्णालय : सकाळी 8 ते रात्री 8

चिखली – म्हेत्रेवस्ती दवाखाना : सकाळी 9 ते दुपारी 1

थेरगाव- खिंवसरा पाटील रुग्णालय : सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत

पिंपळेगुरव-बॅडमिंटन हॉल :  सकाळी 9.30 ते दुपारी 4

पूर्वी कोरोना चाचणी केंद्राची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 अशी होती. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे.

दुपारनंतर चाचणी केली जात नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. नागरिकांच्या सोयीसाठी वेळ वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी या वेळेत चाचणी केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.