Coastal Road : कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मुहूर्तावर निर्णय

एमपीसी न्यूज : छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आपल्या सगळ्यांना प्रेरणा, एक आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांचं बलिदान आहे हे कोणी विसरू शकणार नाही. (Costal Road) त्यामुळे मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याची घोषणा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. 

शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि संभाजी महाराज यांनी त्याला कळस चढवला. छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम केले आहेत, त्यामुळे त्यांच्या शोर्याच्या आठवणी आपण जतन करणे गरजेचे असल्याचेही मत मु्ख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नोंदवले.

Pune : कार्यक्षम, कुशल पिढी घडवण्याला प्राधान्य हवे – विखे पाटील

छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळात 120 लढाया लढल्या, मात्र त्यांचा कधीही पराभव झाला नाही. तसेच जगात कुठेही नसतील असे जलदुर्ग त्यांनी बांधले. हीच प्रेरणा घेऊन नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नौदलाच्या झेंड्यावर राजमुद्राला स्थान दिले असल्याचेही मु्ख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. (Costal Road) तसेच त्यांच्या आठवणी जपण्यासाठी, खाणाखुणा जपण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या त्या कतृत्वासमोर आणि शोर्यासमोर त्या छोट्याच ठरतील, असे देखील ते म्हणाले आहेत.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यामुळे आमचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर आम्ही प्रथम तो निर्णय घेतला. मागच्या सरकारने अल्प मतात आल्यावर घाई घाईने निर्णय घेतला होता. पण त्यानंतर अधिकृतपणे आपण त्याला परवानगी दिली असल्याचेही देखील (Costal Road) मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगत ठाकरेंवर टीका केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.