Alandi : गावठाणा लगतची स्मशानभूमी तत्काळ आरक्षित जागेवरती स्थलांतरित करण्याबाबतचे लाक्षणिक उपोषण मागे

एमपीसी न्यूज –  आळंदी (Alandi) नगरपरिषदे समोर लाक्षणिक उपोषण चालू होते. हे लाक्षणिक उपोषण पुणे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे संदीप रंधवे यांच्या वतीने चालू होते.

आळंदी शहरातील गावठाणा लगतची स्मशानभूमी तत्काळ आरक्षित जागेवरती स्थलांतरित करण्यासाठी नगरपरिषदेला वारंवार गेल्या वर्षभरात चार वेळा स्मरण पत्र निवेदन देऊन पाठपुरावा करून सुद्धा नगरपरिषदेने जणीवपूर्वक इनामवर्ग ( 6 ब) च्या जागा गिळंकृत करण्याचा लागोपाठ धडाका चालविलेला आहे. याबाबत त्यांचे लाक्षणिक उपोषण चालू होते. याची दखल आळंदी नगरपरिषदेने घेतली.

PMC : पुणे महानगरपालिका 25 तृतीयपंथीयांची कंत्राटी पद्धतीने करणार नियुक्ती
संदीप रंधवे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांचे लाक्षणिक उपोषणाबाबत दिनांक 19 मे रोजीचे निवेदन आळंदी पालिका कार्यालयास प्राप्त झाले आहे. सदर निवेदना मध्ये आपण एकूण 5 मागण्या केल्या आहेत. सदर मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी सद्यस्थितीत मे. सर्वसाधारण सभा अस्तित्वात नसल्याने प्रशासक या नात्याने सदर मागण्यांवर प्रशासक, नगरपरिषद आळंदी (Alandi) तथा तहसीलदार खेड या नात्याने बैठक आयोजित करण्या बाबतची तारीख निश्चित करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

त्याची सोबत प्रत संलग्न केली आहे. त्यांचेकडून बैठकीची तारीख निश्चित झाल्यानंतर आपणास कळवण्यात येईल. तोपर्यंत आपले लाक्षणिक उपोषण मागे घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे. असे लेखी पालिकेचे पत्र मिळाल्याने उपोषणकर्त्याने आज संध्याकाळी सहा वा.लाक्षणिक उपोषण मागे घेतले.

यावेळी उपोषणकर्ते संदीप रंधवे यांनी सांगितले स्मशानभूमीतील संबंधित काम जैसे से थे रहावे. स्थगित रहावे. यावेळी पालिका कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे,नगर अभियंता संजय गिरमे, बाळासाहेब चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Vadgaon Maval : धक्कादायक! दगडाने ठेचून सुरक्षा रक्षकाचा खून

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.