Cricket : U19 वुमेन्स व्हेरॉक कप सामन्यात सुहानी कहांडळ व सहेज कौर ठरल्या सामना वीरांगना

एमपीसी न्यूज – आज झालेल्या U19 वुमेन्स व्हेरॉक कप या साखळी (Cricket) सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीची सुहानी कहांडळ व क्रिकेट डिफेन्स अकॅडमीची सहेज कौर या खेळाडू सामना वीरांगना ठरल्या आहेत.

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी व बी अ स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या दरम्यान खेळळ्या गेलेल्या सामन्यात वेंगसरकरच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 273 धावांचे डोंगर उभे केले. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बी अ स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ अवघ्या 33 धावांवर गडगडला. वेंगसरकर संघाने 240 धावा शिल्लक ठेवत मोठ्या फरकाने हा सामना आपल्या नावे केला आहे. या सामन्यात 50 चेंडूत 122 धावांची धडाकेबाज खेळी करणारी सुहानी कहांडळ ही सामना वीरांगना ठरली.

Pune : पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पत्र वाटप 

किंग्स स्पोर्ट्स क्लब आणि क्रिकेट डिफेन्स अकॅडमी यांच्यात झालेल्या लढतीत डिफेन्स अकॅडमीने किंग्स स्पोर्ट्स क्लबचा 8 विकेट राखून पराभव केला. (Cricket)

प्रथम फलंदाजी करताना किंग्स स्पोर्ट्स क्लबने 143 धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये पायल पवार हिने 71 धावांची अर्धशतकी खेळी केली. क्रिकेट डिफेन्स अकॅडमीने हे लक्ष्य 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज गाठले. या सामन्यात इशा घुले हिने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात 11 धावा आणि 2 बळी घेणारी सहेज कौर सामान वीरांगना ठरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.