Pune : पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पत्र वाटप 

एमपीसी न्यूज – पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ( Pune) पदाधिकाऱ्यांची नियुक्ती शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करत, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Pune : ईव्हीएम जनजागृती, प्रात्याक्षिक मोहिमेचा शुभारंभ

या प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांशी   विद्यार्थी संघटनेमार्फेत विविध उपक्रम राबवण्यासंदर्भात आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यासोबतच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील काळातील उपक्रम आणि संघटन वाढीसंदर्भात मार्गदर्शन देखील मानकर यांनी केले.

पक्ष संघटनेच्या विकासासाठी सर्व पदाधिकारी सदैव कटिबद्ध राहतील, असा विश्वास आहे. यावेळी युवक अध्यक्ष समीर चांदेरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष शुभम माताळे, कार्याध्यक्ष सुमित केदासे, विद्यार्थी शहर उपाध्यक्ष सत्यम पासलकर, तसेच विद्यार्थी कोथरुड विधानसभा अध्यक्ष अनिकेत मोकर यांची उपस्थिती ( Pune)  होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.