Crime News : गाडी अनलोडींगच्या नावावार खंडणी उकळणाऱ्या 14 माथाडी कामगारांवर गुन्हा

एमपीसी न्यूज –  गाडी अनलोडींग करण्यासाठी दिवसाला 200 ते 300 याप्रमाणे 2021 पासून 4 ते 6 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्यांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 माथाडी कामगारांवर (Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2021 पासून  टोल इंडिया लॉजीस्टीक प्रा.ली. कंपनी खराबवाडी येथे घडत होता.

याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अभिजीत धनंजय कुलकर्णी (वय 41 रा.तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली असून टोली क्रमांक 401 मधील नोंदणीकृत माथाडी कामगार प्रभाकर रामदास तळेकर, कृष्णा बाबाजी चौधरी, राजेश किसन गुळवे, गणेश सिताराम जाधव, मोहन कोंडीबा थोरवे,प्रसाद जालींदर कदम,  स्वप्नील दिपक टेमकर, बाळासाहेब सिताराम गाढवे, संदय यशवंत नाईकरे, नंदकुमार रामदास वायाळ, नवनाथ धोंडीभाऊ खंडागळे, मोहन दौलत बोंबे, सोमनाथ वसंत बोंबे या 13 माथीडी कामगारांसह  प्रशांत बबन तळेकर या मुकादमावर  खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

MPC News Podcast 14 February 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोल इंडिया लॉजीस्टीक प्रा.ली. कंपनी खराबवाडी येथे येणाऱ्या ट्रान्सपोर्ट आर.एस.  सितारगंज, उत्तराखंड, आर.साई. ट्रान्सपोर्ट उत्तराखंड, तिरुपती लॉजीस्टीक होसूर, कर्माटक व तिरुपती लॉजीस्टीक मुंबई, रजनी ट्रान्सपोर्ट बँगलोर अशा विविध छिकाणांवरून येणारा माल कंपनीत गाड्या अनलोड करत असताना आरोपी हे रोख स्वरूपात व गुगल पे द्वारे 200 ते 300 स्वरूपात  दररोज 5 ते 10 गाड्यांच्या ड्रायव्हरकडून घेत, असे दिवसाचे एक हजार ते दिड हजार म्हणजे महिन्याला 25 ते 37 हजार रुपये असे 2021 सालापासून 4 ते 6 लाख रुपये आरोपींनी संगनमत करून गाडी ड्रायव्हरकडून घेतले आहेत.अद्याप कोणाला अटक झाली नसून वरील 14 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी औद्योगीक क्षेत्रात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसवण्साठी उद्योजकांसी संवाद साधत त्यांना यासंबंधी पोलिसांची मदत मागण्याचे आव्हान केले होते. तसेच माथाडी कामगारांकडून होणाऱ्या दमदाटीसाठीही नवीन व्हॉटसअप नंबरही पोलिसांनी जाहीर केला होता. त्यांनतर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.  त्यामनुळे छुप्य़ा पद्धतीने उकळल्या जाणाऱ्या या खंडणीला नक्की आळा बसेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.