Crime News : ‘इधर आकर लडकिया देखता है क्या’, म्हणत तरुणाला जबर मारहाण

एमपीसी न्यूज : फूड स्टॉलवर (Crime News) जेवण करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला चार जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाषाण परिसरातील पांडव नगरमध्ये 3 डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अंकित कुमार सिंग (वय 26) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार श्याम तिवारी आणि त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे जेवण करण्यासाठी पांडव नगर परिसरात असणाऱ्या फूड स्टॉलवर गेले होते. यावेळी आरोपी शाम तिवारी आणि त्याचे मित्र त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादीला तू इधर आकर लडकिया देखता है क्या? कल से इधर नही देखने का असे म्हणत फिर्यादी यांच्या डोक्यात लाकडी स्टंपने मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा (Crime News) दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Hadapsar News : मालकाच्या घरात दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला बेड्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.