Chikhali :  कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून 36 लाखांची फसवणूक केली. या प्रकणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2018 ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली.  

दिलीपकुमार वसंतराव कुलकर्णी (वय 55), कविता दिलीपकुमार कुलकर्णी (दोघेही रा. ससाणेनगर, हडपसर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ऐश्‍वर्या प्रमोद निजामपूरकर (वय 24, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी ऐश्‍वर्या यांचा विश्‍वास संपादन केला. इंद्रायणी इंडस्ट्रीयल इस्टेट, चिखली येथे फिर्यादी यांच्या टास्क ऑटो इंजिनिअरिंग कंपनीत तयार झालेले पार्ट स्वतःच्या कंपनीतर्फे प्रितेश मोरे हे कामास असलेल्या हेल्कोन सिस्टीम एलएलसी या कंपनीला विकून त्याद्वारे पैसे कमावून फिर्यादी ऐश्‍वर्या यांची 36 लाख 48 हजार 810 रुपयांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.