Pimpri news: आमदार अण्णा बनसोडे यांच्या निधीतून ‘वायसीएमएच’ला सीटी स्कॅन मशीन

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम )
सुमारे 1 कोटी 30 लाख रुपये किंमत असलेले सीटी स्कॅन मशीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदार निधीतून बसविण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रत्येक विधानसभा सदस्याला एक कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. 

या निधीचा वापर शहरातील कोविड ग्रस्त रुग्णांना व इतर रुग्णांना कायम स्वरूपी व्हावा, अशा दूर दृष्टीने आमदार बनसोडे यांनी तातडीची गरज ओळखून या कामासाठी निधी दिला असून तात्कळ मशीन खरेदी करण्याच्या सूचना प्रशानास दिल्या आहेत.  याबाबतचे पत्र  जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले आहे.

कोरोना ग्रस्त रुग्णांची फुप्फुसे किती संक्रमित आहेत याचे अचूक मोजमाप सिटी स्कॅन मशीनद्वारे करण्यात येते. रुग्णाचा HRCT स्कोर किती आहे त्याप्रमाणे तज्ञ डॉक्टर रुग्णावर औषध उपचार करतात. कोरोना अर्थात कोविड -19 हा विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसावर आक्रमण करतो व निमोनिया वाढल्याने रुग्णास श्वास घेण्यास त्रास होतो परिणामी रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ लागते. पातळी खालावल्यामुळे रुग्ण आत्यावस्त होते.  म्हणून रुग्णाचे फुफ्फुस कितीं संक्रमित आहे याचा अचुक अंदाज सिटी स्कॅन मशीनच्या HRCT रिपोर्ट द्वारे मिळतो.

सध्या वायसीएमहॉस्पिटलमध्ये खाजगी कंपनीच्या मालकीची सिटी स्कॅन मशीन कार्यरत असून खाजगी कंपनी रुग्णाकडून  सिटी स्कॅनचा खर्च वसून करीत आहे. आमदार निधीतून सिटी स्कॅन मशीन मिळाल्यामुळे  शहरातील रुग्नांचा खर्च वाचणार आहे.  वायसीएम मध्ये सिटी स्कॅन करणारी कंपनी शहरातील नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्य डोक्यातून कुशाग्र बुद्धीने पेरलेले बीज मनपाचे व सामान्य जनतेचे शोषण करीत आहे. याठिकाणी स्कॅनसाठी 1200  ते 5 हजार रुपये आकारणी करण्यात येते. स्कॅनचा खर्च रुग्णास करावा लागतो. आता मशीन दिल्याने सिटी स्कॅन मोफत होणार आहे.

आमदार बनसोडे म्हणाले, प्रशासन झटून काम करीत आहे. आरोग्य यंत्रणा विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. लॉक डाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडून नये. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, प्रत्येक नागरिकाने खबरदारी घ्यावी, लक्षणे असल्यास तात्काळ उपचार घ्यावेत,  वेळे उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो परंतू नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.