Wakad Crime News : इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग 

एमपीसी न्यूज – इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. 23 मार्च 2019 ते 23 एप्रिल 2021 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने हा प्रकार घडला. 

याप्रकरणी पिडित महिलेनं शुक्रवारी (दि. 23) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इन्स्टाग्राम अकाउंट rushijadhav_याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींने फिर्यादी महिलेला इन्स्टाग्रामवरुन अश्लील मेसेज पाठवून शिवीगाळ केली. तसेच, मोबाईलवर फोन करून अश्लील बोलला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगारे करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.