Pune : राज्यात अवकाळीने 87 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

एमपीसी न्यूज : काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास 12 जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. (Pune) मात्र, सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे.  सुमारे 87378.72 हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या नैसर्गिक आपत्ती नुकसान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, 7 ते 20 एप्रिल या कालावधीत नाशिक जिल्ह्यात 37,981.79  हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Pune : कोथरुडमध्ये दोन रिक्षाची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू दोघे गंभीर जखमी

त्यात प्रामुख्याने कांदा, द्राक्षे, भाजीपाल्याचा समावेश आहे. त्यापाठोपाठ नगर जिल्ह्यात 16091 हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यात मका, कांदा, वाटाणा, किलगड, आंबा, झेंडू, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, डाळिंब पिकांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात 8765 हेक्टरवर नुकसान झाले असून, त्यात लिंबू, भुईमूग, कांदा, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6243 हेक्टरवरील बाजरी, गहू, कांदा, आंबा, सूर्यफूल, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

 

जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

नाशिक :  37, 981.79 नगर : 16,091, अकोला : 8, 765.45 , छत्रपती संभाजीनगर : 6,243, बीड : 4,994 , धाराशिव : 3,983.80, जळगाव :  2,481.66, बुलडाणा : 2,177, अमरावती : 886 , सातारा : 615 , सोलापूर : 263.36, जालना : 432.80, पुणे : 593 , धुळे : 411.95, यवतमाळ : 120.68, सांगली : 110, नागपूर : 79.20, लातूर : 57, गोंदिया : 57.53, रत्नागिरी: 56, रायगड : 50, कोल्हापूर : 51, सिंधुदुर्ग : 38, वाशिम : 18, वर्धा : 33.50

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.