Pune : कोथरुडमध्ये दोन रिक्षाची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू दोघे गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात जाणाऱ्या रीक्षाने समोरून येणाऱ्या दुसऱ्या रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.  (Pune) या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चांदणी चौक ते कोथरूडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर 25 एप्रिल रोजी हा अपघात झाला. 

या अपघातात प्रशांत दराडे (वय 38, श्रमिक वसाहत कोथरूड) या इसमाचा मृत्यू झाला तर आशिष पढेर आणि आणखी एक असे दोघे जखमी झाले आहेत. आशिष पढेर यांनी या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार MH12 JS 2182 क्रमांकाच्या रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC : सौर उर्जा प्रकल्प, वीज बचत धोरणाचा अभाव; वीज बिलापोटी पालिका मोजते 150 कोटी

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे मयत प्रशांत दराडे आणि आणखी काही मित्रांसमवेत रिक्षातून जात होते. यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाने (Pune) फिर्यादी यांच्या रिक्षाला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रशांत दराडे यांचा मृत्यू झाला. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.