Ravet News : दृष्टिहीन मुलांसोबत दीपक भोंडवे यांचा वाढदिवस साजरा; बालजत्रा आणि खाऊ गल्लीला उत्स्फुर्त प्रतिसाद 

एमपीसी न्यूज – रावेत येथील युवा नेते दीपक मधुकर भोंडवे यांचा वाढदिवस माई बालभवन अंध संस्थेतील मुलामुलींसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालचमूंसाठी बालजत्रा आणि खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर परिसरातील बालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. दरम्यान, अभिनेत्री इशा केसकरच्या उपस्थितीने अभिष्टचिंतन सोहळ्याची रंगत आणखी वाढली.

किवळे गावातील मुकाई चौक, आदर्शनगर येथे हा कार्यक्रम पार पडला. पिंपरी चिंचवड महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्यासह अन्य मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त दीपक भोंडवे यांचे अभिष्टचिंतन केले.

यावेळी विजय पानसरे प्रस्तुत ‘सलाम इंडिया’ हा सांगीतिक कार्यक्रम पार पडला. रावेत किवळे परिसरातील लहान मुलांसाठी बालजत्रा तसेच खवय्यांसाठी खाऊ गल्ली कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

कार्यक्रमादरम्यान माई बाल भवन अंध मुलामुलींच्या संस्थेसाठी दीपक भोंडवे यांच्या वतीने आथिर्क मदत करण्यात आली. दरम्यान, याच संस्थेतील दृष्टिहीन मुलामुलींसोबत भोंडवे यांनी वाढदिवसाचा केक कापला.

संदीप काळोखे, अमोल कालेकर, अशोक करमारे, प्रशांत कुंभार, निखील जाधव, वैभव देशमुख, अशोक काळे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.