Pune News : शहराचे विद्रुपीकरण थांबणार! पालिका करणार ओव्हरहेड केबलचे सर्वेक्षण 

एमपीसी न्यूज : शहरात वेगवेगळ्या बिल्डिंग, खांब आणि झाडांवर लोंबकळणाऱ्या केबल्समुळे पुण्याचे विद्रुपीकरण होत आहे. ओव्हरहेड केबल्सच्या या जाळ्यामुळे प्रशासनाचा महसूलाचे देखील नुकसान होत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका  ने शहरभरातील ओव्हरहेड केबलचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात रस्त्यावरील विजेच्या खांबा, इमारती, झाडांवरून  बेकायदा ओव्हर हेड ऑप्टिक फायबर केबल टाकण्यात आल्या आहेत.या सर्व केबल बेकायदेशीर असून यामुळे आतापर्यंत पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे.

”महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार, शहरात लोंबकळणाऱ्या टीव्ही, इंटरनेट, ब्रॉडबँड, ऑप्टिकल फायबर केबल साठी कोणतीही तरतूद केलेली नाही. शहरातील अनधितकृत लोंबकळणाऱ्या केबल्स जाळ्यामुळे शहरातील क्षितीजे खराब होत असून शहर विद्रुप होत असल्यामुळे त्या हटवाव्या लागणार आहेत.

महापालिका शहरातील अनधिकृत ओव्हरहेड केबल्सच्या जाळ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करणार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.  महापालिका प्रत्येक केबल मालकाला या ओव्हरहेड केबल हटवून, भूमिगत ठेवणे बंधनकारक करणार आहे. तसेच यासाठी प्रती मिटर केबलनुसार वार्षिक रक्कम आकारली जाणार आहे. प्रशासन या सर्व्हेसाठी एक किंव एकापेक्षा जास्त संस्थाची नेमणूक करू शकते. पुढील 3 वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.