Dehu : मधुकरराव पवळे प्रतिष्ठानतर्फे देहू येथे इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानातून 5 ट्रक कचरा केला गोळा

एमपीसी न्यूज- माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे यांच्या संकल्पनेतून निगडी येथील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे प्रतिष्ठान व जय बजरंग तरुण मंडळ निगडी यांच्या वतीने देहू येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानातून 5 ट्रक कचरा घाटावरून गोळा करण्यात आला.

रविवारी (दि. 28) सकाळी 6 ते साडेनऊ वाजेपर्यंत हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे, राजेंद्र साळुंके, दिलीप शिंदे, कालिदास केंदळे, रोहित खर्गे, बाळा मोरे, प्रदीप पडवळ, लहू धुमाळ, मारुती चौगुले, शेखर चव्हाण, बंडू घोटाकुले, राजू चौधरी, सतीश झेंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.