Dehu road ganja : गांजासह तरुणाला देहूरोड येथून अटक

एमपीसी न्यूज :  पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथील उड्डाणपुलावर तरुणाला 490 ग्रॅम वजनाचा गांजासह अटक करण्यात आली आहे.(Dehu road ganja) ही कारवाई मंगळवारी (दि. 20) दुपारी देहुरोड पोलिसांनी केली आहे.

विजयकुमार श्रीकृष्ण चौधरी (वय 30, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने बंटी साळुंके (रा. दांडेकर पूल, पुणे) यांच्याकडून गांजा आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari crime : महाविद्यालयीन तरूणीला पाठलाग करून त्रास देणाऱ्या रोडरोमिओवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गांजा बाळगल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी कारवाई करून विजयकुमार याला ताब्यात घेतले.(Dehu road ganja) त्याच्याकडून 11 हजार 500 रुपये किमतीचा 490 ग्रॅम गांजा, दोन हजारांचा मोबाईल फोन, 600 रुपये रोख रक्कम असा एकूण 14 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.