Dehuroad : भरदिवसा कारची तोडफोड केल्याप्रकरणी दोघांना अटक

Dehuroad : Both arrested for vandalizing a car during the day

एमपीसी न्यूज – भरदिवसा कारची तोडफोड करून नुकसान केले. तसेच कारमधील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना 13 मे रोजी दुपारी विकासनगर देहूरोड येथे घडली. याप्रकरणी 23 मे रोजी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

निरंजन नरेंद्र गायकवाड (वय 19, रा. गहुंजे), मिलिंद लक्ष्मण शेलार (वय 21, रा. श्रीनगर देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह कुंदन गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप वसंत कडलक (वय 46, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी आरोपींनी फिर्यादी यांच्या कारची (एम एच 14 / एक्स 1300) दगड आणि तलवारीने तोडफोड केली. तसेच कारमधील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 700 ते 800 रुपयांची रोकड चोरून नेली. फिर्यादी संदीप यांनी याबाबत शेजारी, परिसरात राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली असता हा प्रकार आरोपी निरंजन, मिलिंद आणि कुंदन यांनी केला असल्याचे समजले असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.