Dehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

आजपर्यंत हद्दीत एकूण 1055 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, गुरुवारी चिंचोली येथे 2, तर श्रीविहार, बरलोटा नगर, किन्हई आणि संकल्प नगरी येथे प्रत्येकी एक अशा एकूण 6 कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांची भर पडल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1055 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 6 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 1055 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आजपर्यंत एकूण 869 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 153 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सध्या 9 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 47 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये कॅन्टोन्मेंट हद्दीतील 36 आणि हद्दीबाहेरील 11 रुग्णांचा समावेश आहे.

तर पिंपरी चिंचवड महापालिका कोविड सेंटरमध्ये 2 रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच पुणे रेल्वेच्या कोविड सेंटरमध्ये एका रूग्णावर उपचार सुरु आहेत.

होम आयसोलेशनमध्ये 111 रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 27 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.