Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 138 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 126 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (गुरूवारी, दि. 17) कोरोनाचे 126 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 3 हजार 417 झाली आहे. तर दिवसभरात 136 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कामशेत (महिला, 43 वर्ष), लोणावळा (पुरुष, 62 वर्ष) येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 72 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 54 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 24, लोणावळा शहरात 38, वडगावात 10 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 3 हजार 417 रुग्णांमध्ये सध्या 863 रुग्ण सक्रीय आहेत. तर 2 हजार 445 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 56, लोणावळा नगरपरिषद 691 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 224 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 446 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.