Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आजपर्यंतची रुग्ण संख्या1200; एकूण डिस्चार्ज 1076

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, शनिवारी दत्तनगर, थॉमस कॉलनी, किन्हई, मेहता पार्क येथे प्रत्येकी एक आणि मेन बाजार येथे 2, असे एकूण 6  कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. आजपर्यंत हद्दीत एकूण 1200 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शुक्रवारी शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

कोरोनातून बरे झालेल्या 7 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण 1076 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 69 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 11 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या 92 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 12 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 32 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.