Dehuroad crime News : म्हाडामध्ये सदनिका आरक्षित करून देण्याच्या बहाण्याने महिलेची सव्वा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – म्हाडा आवास योजनेमध्ये सदनिका आरक्षित करून देण्याचा बहाण्याने तिघांनी मिळून वृद्ध महिलेची 1 लाख 35 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर 2017 पासून 12 नोव्हेंबर 2020 या कालावधीत घडला.

विद्या फ्रान्सिस वंजारे (वय 62, रा. देहूरोड) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पास्टर राजेंद्र कदम, रिना कदम, विजय भंडारे (सर्व रा. देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना म्हाडाच्या आवास योजनेमध्ये सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून 1 लाख 35 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना खोट्या पावत्या देखील दिल्या.

मात्र, सदनिका मिळवून न देता तसेच घेतलेले पैसे परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.