Dehuroad Crime News : तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करणाऱ्याला अटक; 6.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – तंबाखूजन्य पदार्थ तसेच पान मसाला यांचा विक्रीसाठी साठा करणा-याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.22) पहाटे साडेतीनच्या सुमारास तळवडे येथे ही कारवाई करण्यात आली.

बिंदुचंदी यादव (वय 33, रा. तळवडे) व दीपकचंदी यादव (वय 22, रा. तळवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.22) अटक आरोपी यांनी तंबाखूजन्य पदार्थ व पान मसाला यांचा विक्रीसाठी साठा करून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन 6 लाख 29 हजार 571 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.