Pimpri News: स्थायीसह विविध समितीच्या सभा पूर्वीप्रमाणेच  

सर्वसाधारण सभेबाबत अनिश्चितता

एमपीसी न्यूजकोरोना साथीच्या प्रादूर्भावामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरु असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध समितींच्या सभा नियमितपणे घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेबाबत कोणतेही आदेश आल्याने सर्वसाधारण सभांचे काय होणार असा प्रश्न आहे.सर्वसाधारण सभेबाबत अनिश्चितता आहे.

मेट्रो सिटींमध्ये कोरोना साथीचा आलेख वाढत असल्याने महापालिकांच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या होत्या. त्यानुसार, गेल्या तीन महिन्यांपासून या सभा होत होत्या. डिसेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नियमित सभा घेण्यास राज्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी नवीन आदेश दिला आहे. त्यात स्थायी समितीसह विविध समितींच्या सभा नियमितपणे घेण्यास मान्यता दिली आहे.

सरकारने दिलेल्या सभांविषयीच्या नवीन आदेशात सर्वसाधारण सभेविषयी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. सध्या ही महासभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जाते. पुढील सभा २० जानेवारी रोजी आहे. विशेष सभेचे नियोजन महापालिका करत आहे. त्यामुळे महासभेचे काय होणार, याबाबत अनिश्चितता असल्याचे दिसून येत आहे.

विविध समिती सभेसाठी हे आहेत नियम
आरोग्य विषयक निकष, कोवीड-19 संदर्भातील विहीत कार्यपद्धती पालन करावे. बैठकांमध्ये मास्कचा वापर, योग्य शारिरीक अंतर ठेवावे, हातांची स्वच्छता, सर्दी व खोकताना काळजी घ्यावी. बैठकीसाठी पुरेशी मोकळी हवेशीर जागा, सॅनिटायझरचा वापर करावा. बैठकीच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावर बैठक व्यवस्था करुन सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

”स्थायी समितीसह विविध विषय समितीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेतली जात होती. या सभा पूर्वीप्रमाणे घेण्यास राज्य सरकारने सूचविले आहे. त्यानुसार, नियमांचे पालन करून सभा घेण्यात येईल, असे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.