DehuRoad News: कंपनीचा शेडचा पत्र कापून 2 लाख 23 हजाराचे साहित्य चोरले

एमपीसी न्यूज – कंपनीच्या शेडचा पत्र कापून आतमध्ये घुसून चोरट्यांनी कंपनीतील 2 लाख 23 हजार 200 रुपयांचे साहित्य चोरुन नेले. हा प्रकार गुरुवारी रात्री साडेसात ते शुक्रवारी सकाळी आठच्या दरम्यान विठ्ठलवाडी, देहूगाव येथे घडला.  

याप्रकरणी रामकृष्णन पोन्नुचामी (वय 57, रा. डुडुळगाव, चिखली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोन्नुचामी यांची देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देहूगाव विठ्ठलवाडी येथे कंपनी आहे. गुरुवारी रात्री कंपनी बंद केली होती. रात्री चोरट्यांनी कंपनीच्या शेडचा पत्रा कापला आणि हात घुसले. कंपनीतील वेल्डींग टॉर्च, 300 मीटर लांबीची तांब्याची जुने वापरती वेल्डींग केूल, कोअर ताब्यांची केबल, गॅस कटिंग टॉर्च, रेग्युलेटर, ऑक्सीजन रेग्युलेटर, इलेक्ट्रीक तांब्याच्या कोअर केबल असे 2 लाख 23 हजार 200 रुपयांचे साहित्य चोरुन नेले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.