Dehuroad News : विक्रीसाठी गांजा बाळणा-याला अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी गांजा बाळणा-याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.15) दुपारी दोन वाजता अंमली पदार्थ विरोधी पथकाने विठ्ठलवाडी येथे ही कारवाई केली.

जितु कैलास गायकवाड (वय 32, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विक्री करण्याच्या उद्देशाने 11 हजार 300 रूपये किंमतीचा 452 ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगला होता. आरोपी तुतीच्या झाडाखाली असताना अंमली विरोधी पथकाने त्याला अटक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.