Dehuroad : विश्व हिंदू परिषद- बजरंग दलच्या वतीने कारसेवकांचा सत्कार

देहूरोड शहरात 1555  लाडू प्रसाद वाटप करण्यात आले. : Vishwa Hindu Parishad- Bajrang Dal felicitates Karsevaks

एमपीसीन्यूज : 1992  साली अयोध्येत झालेल्या कारसेवत सहभागी झालेल्या 20 कारसेवकांचा विश्व हिंदू परिषद- बजरंग दल देहूरोड प्रखंडाच्यावतीने आज, गुरुवारी सत्कार करण्यात आला. तसेच देहूरोड शहरात 1555  लाडू प्रसाद वाटप करण्यात आले.

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच तरी राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत 20 कारसेवकांचा विश्व हिंदू परिषद- बजरंग दलच्या वतीने गौरव करण्यात आला.

देहूरोड येथून 1992  साली अयोध्येत गेलेल्या लक्ष्मण रेड्डी, सुरेश पगङे, अशोक येलमार, धनाजी शिंदे,  शंकर पगडे, भाऊ काकडे, सोपानराव म्हाळसकर, ज्ञानेश्वर गाडे, सोपानराव ढोरे, ज्ञानेश्वर ढोरे,रवींद्र आचार्य, गोविंदराव गुरव, दिनेश गुरव, सुनील गुरव, भास्करराव बवरे, मोहन वाघुले, बाळासाहेब भगत, गिताबाई दुगम तसेच कै.रामचंद्र भिलारे, कै. रघुनाथराव शिंदे यांच्या कुटुंबीयांचा विश्व हिंदू परिषद- बजरंग दलच्या वतीने गौरव करण्यात आला.

तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या हस्ते देहूरोड शहरात 1555 लाडू प्रसाद वाटप करण्यात आले.

या वेळी विश्व हिंदू परिषद सेवा विभागाचे जिल्हा प्रमुख दिनेश श्रीवास, बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगङे, देहूरोड प्रखंड मंत्री प्रविण फाकटकर, देहूरोड संयोजक मुकेश पाठक, सचिन शेलार, अंबादास पाटील, दिपक अग्रवाल, भास्कर गोलिया आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.