Maval : ओवळे गावातील जागृत श्री.म्हसोबा देवस्थान मंदिराचे बांधकाम लांबणीवर

एमपीसी न्यूज- मावळ (Maval) ओवळे गावातील श्री.म्हसोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असुन येथे दरवर्षी अनेक भाविक-भक्त पुणे-मुंबई व महाराष्ट्रातुन दर्शनासाठी येतात. त्यांच्यापैकी अनेक भाविक-भक्तांनी केलेले नवस पुर्ण झालेले आहेत. असे येथील स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत.
नुकतेच श्री.म्हसोबा देवाचे मंदिर बांधकाम करण्याचे पवित्र कार्य ओवळे गावचे युवा नेते, शिवभक्त अजित शिंदे यांनी हाती घेतले होते. काही दिवसांपुर्वी मंदिर बांधकाम करणे कामाचा भुमिपुजन समारंभ गावातील अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता.

समाजातील अनेक दानशूर व्यक्तींकडून ह्या मंदिर बांधकाम कामासाठी देणगी देखील गोळा करण्यात आली होती. तसेच, येत्या काही दिवसांत मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात येणार होते.परंतु सध्या काही कारणास्तव तसेच, लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने ह्या मंदिराचे बांधकाम होणार नाही.
अशी माहीती शिवभक्त अजित शिंदे यांनी दिली. त्यामुळे, ह्या मंदिर बांधकामासाठी ज्या देणगीदारांनी देणगी दिली.त्या सर्व देणगीदारांची देणगी परत करण्यात येणार आहे. तसेच, भविष्यात ओवळे गावातील (Maval) श्री.म्हसोबा देवस्थान मंदिराचे बांधकाम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.