Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीची नोटीस

एमपीसी न्यूज : राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना ईडीने (Delhi) नोटीस पाठवली आहे. त्यामुळे सर्वत्र राजकीय  खळबळ उडाली आहे.

दिल्लीमध्ये नव्या दारू योजना घोटाळ्याच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

यापूर्वी त्यांना याच विषयावरून CBI कडून एप्रिल महिन्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांना आलेल्या ईडीच्या  नोटीसमुळे इंडिया आघाडीतील नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

Pimpri : स्वातंत्र्य चळवळ आणि  राष्ट्रीय एकात्मतेविषयी युवकांमध्ये जनजागृती गरजेची – डॉ. शिवाजी मुंढे

विशेष म्हणजे सध्या आम आदमी पार्टीचे तीन मोठे नेते दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. अलीकडेच आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ईडीने चौकशीनंतर अटक केली होती. संजय सिंह यांच्या अटकेनंतर भाजपने अरविंद केजरीवाल ( Delhi) यांना लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.