Delhi news: केंद्र सरकारने राज्याचा जीएसटीचा परतावा, अनुदान तात्काळ द्यावे; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

केंद्र सरकारने अपेक्षित असलेले जीएसटीचे अनुदान राज्य सरकारला अद्याप दिले नाही. राज्य सरकार आर्थिक संकटात आहे.

0

एमपीसी न्यूज – जग कोरोनाच्या महामारीचा सामना करत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्र सरकार या महामारीचा सक्षमपणे सामना करत आहे. परंतू, केंद्र सरकारने महाराष्ट्राला जेवढे सहकार्य करणे आवश्यक आहे. तेवढे केले जात नाही. केंद्र सरकारने अपेक्षित असलेले जीएसटीचे अनुदान राज्य सरकारला आद्यप दिले नाही. राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ राज्याचा जीएसटीचा परतावा, अनुदान द्यावे अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारच्या होत असलेल्या आर्थिक कोंडीकडे लक्ष वेधले.

शून्य काळात बोलताना खासदार बारणे म्हणाले, संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीचा सामना करत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्र सरकार या महामारीचा सक्षमपणे सामना करत आहे. परंतू, केंद्र सरकारने महाराष्ट्राला जेवढे सहकार्य करणे आवश्यक आहे. तेवढे केले जात नाही.

केंद्र सरकारकडून जीएसटीचे जेवढे अनुदान राज्य सरकारला देणे अपेक्षित आहे. ते केंद्र सरकारकडून अद्याप मिळाले नाही. महाराष्ट्रातून सर्वांत जास्त कर केंद्राला मिळतो. तरी देखील राज्य सरकार जेवढी मागणी करत आहे ती पूर्ण होत नाही.

या महामारीचा सामना करण्यासाठी जास्तीत-जास्त मदत महाराष्ट्र सरकारला करण्यात यावी. जीएसटीचा महाराष्ट्र सरकारचा परतावा पूर्णपणे तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.