Delhi : हिवाळी अधिवेशनात आज पुन्हा 49 खासदारांवर निलंबनाची कारवाई ; सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा देखील समावेश

एमपीसी न्यूज – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ( Delhi)  पुन्हा कथित घुसखोरीच्या मुद्यावरून संसदेच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी आजही सरकारवर टीकेची झोड उठवत गदारोळ केल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी 49 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा  समावेश आहे आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली आहे. आता हिवाळी अधिवेशनात निलंबीत केलेल्या खासदारांची संख्या ही 141 झाली आहे.

Pune : पुणे पुस्तक महोत्सवात बुधवारी ज्ञानपीठातील ज्ञानतपस्वी, संपादकांचा परिसंवाद

संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत गदारोळ घातल्या प्रकरणी विरोधी पक्षांच्या 49 खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली.

  खालील खासदारांना निलंबित करण्यात आले आहे –

व्ही वेंथिलिंगम, गुरजित सिंग औजला, सुप्रिया सुळे, सप्तगिरी उलाका, अदूर प्रकाश, अब्दुल समद समदानी, मनीष तिवारी, प्रद्युत बोरदोलोई, गिरधारी यादव, गीता कोडा, फ्रान्सिस्को सरदिन्हा, जगत रक्षम, एसआर पार्थिवन, फारूक अब्दुल्ला, ए गणेश मुर्ती, ए., माला राय, वेलुसामी, ए चंदकुमार, शशी थरूर, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव, हसनैन मसूदी, दानिश अली, खादीदुल रहमान, राजीव रंजन सिंग, डीएनव्ही सेंथिल कुमार, संतोष कुमार, ड्युअल चंद्र गोस्वामी, रवनीत बिट्टू, डी. के सुधाकरन, मोहम्मद सादिक, एमके विष्णू प्रसाद, पीपी मोहम्मद फैजल, सजदा अहमद, जसवीर सिंग गिल, महाबली सिंग, अमोल कोल्हे, सुशील कुमार रिंकू, सुनील कुमार सिंग, एचटी हसन, एम धनुष कुमार, प्रतिभा सिंग, थोल थोलमावलम, चंद्रेश्वर प्रसाद, आलोक कुमार सुमन, दिलेश्वर कामत यांना मंगळवारी लोकसभेतून निलंबित करण्यात आले ( Delhi) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.