Pimpri : डेंग्यू व स्वाईन फ्ल्यूबाबत उपाययोजनांची मागणी

एमपीसी  न्यूज –   सध्या पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आदी आजार मोठ्या प्रमाणात फैलावले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य समस्याबाबतचे निवेदन  महाराष्ट्र विद्युत समिती सदस्य मधुकर बच्चे , भारती विनोदे यांनी चिंचवडगावातील तालेरा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी विनादेवी गंभीर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

या आजारावरील उपचारही महागडे असल्यामुळे कित्येक रुग्णांना उपचार वेळेत घेणे परवडत नाही. तसेच अशा आजारांची माहिती व काळजी कशी घ्यावी, याची पुरेपूर माहिती मिळत नसल्यामुळे हे आजार आणखी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. याकरिता महाराष्ट्र विद्युत समिती सदस्य, मधुकर बच्चे व भारती विनोदे यांनी चिंचवडगावातील तालेरा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी विनादेवी गंभीर यांना आरोग्य समस्येचे निवेदन दिले.
यात रूग्णालयामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, रुग्णांना तातडीचे व वेळेवर उपचार मिळावेत तसेच रूग्णालयामार्फत स्वाईन फ्ल्यू ची लस उपलब्ध व्हावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.

यावेळी मुकुंद गुरव, भाजपा पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष, सौरभ शिंदे, गणेश बच्चे, अभिजित पवार, सिद्धू लोणी, राजू कोरे, सौरभ कर्नावट, सुनील कुलकर्णी, गिरीश हंपे, आदी  उपस्थित होते. गरोदर महिला व मधुमेह रुग्णांकरिता स्वाईन फ्लू लस मोफत उपलब्ध केली आहे, रोग तपासणी उपचार त्वरित केले जातील, नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.