Detel Mophed: 20 पैशात एक किलोमीटर प्रवास, भारतातील सर्वांत स्वस्त बाइक लॅान्च

Detel Mophed: One kilometre journey for 20 paise, cheapest bike launch in India आकर्षक दिसणा-या या मोपेडची किंमत फक्त 19,999 रुपये (GST) इतकी आहे.

एमपीसी न्यूज – भारतातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक बाइक डिटेल इंडिया या कंपनीने लॅान्च केली आहे. ही बाईक एका चार्जींगमध्ये 60 किलोमीटर एवढा पल्ला गाठेल असा दावा कंपनीने केला आहे. एक किलोमीटरच्या प्रवासासाठी 20 पैसे एवढा खर्च येईल असे कंपनीने सांगितले आहे.

डिटेल इंडिया या कंपनीने यापूर्वी एलइडी टीव्ही लॉन्च केला होता. त्यानंतर आता इलेक्ट्रिक बाइक क्षेत्रात उडी घेतली आहे. आकर्षक दिसणा-या या मोपेडची किंमत फक्त 19,999 रुपये (GST) इतकी आहे. या मोपेडवरून प्रवास करताना तुम्हाला फक्त 20 पैसे प्रति किलोमीटर खर्च येईल असा दावा कंपनीने केला आहे.

काय आहेत या मोपेडची वैशिष्ट्ये ?

– मोपेडमध्ये कंपनीने 250W क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. यात 48V इतकी क्षमता असून 12AH LiFePO4 बॅटरी वापरण्यात आली आहे.

– मोपेडची बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 7 ते 8 तास इतका वेळ लागतो.

– मोपेडचा टॉप स्पीड हा 25 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

– मोपेड चालवण्यासाठी लायसन्स आणि रजिस्ट्रेशन करण्याची कोणतीही गरज नाही.

– या मोपेडला पेडल दिला असून बॅटरी संपल्यानंतर त्याचा वापर करता येणार आहे

– गाडीला एलइडी कन्सोल दिला असून त्यात गाडीचा वेग आणि चार्जिंग याची माहिती दिसते

– गाडीला दुहेरी शॉक ऍबसॉर्बर देण्यात आला आहे.

– गाडीवर पुरेशी मोकळी जागा देणार आली आहे तसेच पुढे बास्केट लावण्यात आले आहे.

कुठे कराल बुकिंग ?

जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक मोपेड खरेदी करायची असेल तर याबद्दल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट b2badda.com वर संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्ही ही मोपेड ऑनलाइन विकत घेऊ शकता. जर तुम्हाला ही बाइक इएमआय वर घ्यायची असेल तर त्यासाठी इएमआय सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.