Pune : तुनवाल ई-मोटर्सतर्फे पोलिसांना दुचाकी, बॅरिकेडची अनोखी भेट

एमपीसी न्यूज – पोलीस 24 तास डोळ्यात तेल घालून नागरिकांचे संरक्षण करत असतात. या पोलिसांना तुनवाल ई-मोटर्सतर्फे अनोखी ई दुचाकी व 50 बॅरिगेट्स सुपूर्द केल्या आहेत.

 

विद्युत दुचाकींच्या क्षेत्रात अग्रगण्य ‘तुनवाल ई-मोटर्स’ कंपनीतर्फे पुणे शहर पोलिसांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एक ई-दुचाकी आणि 50 बॅरिकेड देण्यात आली. तुनवाल ई-मोटर्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. झुमरमल तुनवाल यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले.

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उड्डाणपुलाचे काम मुदतीपूर्व पूर्ण करण्याचे PMRDA चे निर्देश

खास पोलिसांची गरज बघून गाडीची निर्मीती करण्यात आला आहे.पोलिसांच्या गरजांनुसार या दुचाकी वाहनांमध्ये स्पीकर, सायरन, लाइट व इतर महत्त्वाची साधने बसविण्यात आली आहेत. तुनवालच्या विद्युत दुचाकी एनएफसी कार्डाच्या मदतीने सुरू करता येतात. त्यामुळे गाडीस चावीची गरज लागत नाही. कोठेही चार्जिंग करण्याची सुविधा या गाडीत देण्यात आली आहे, अशी माहिती झुमरलाल तुनवाल यांनी रितेश कुमार यांना दिली. अशी वाहने शहर पोलिसांना उपयुक्त ठरतील, त्यांनी नमूद केले.

अधिक माहितीसाठी संपर्क-

Rama Icon’ Commercial Building, 5th floor, Office No. 501, Behind Sanas Ground, Sarasbaug, Sadashiv peth Pune – 411030 Maharashtra
Contact no. 7559182533
Mail Id : [email protected]

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.