Pimpri : तुनवाल ई-मोटर्स… सर्वात स्वस्त ई बाईक्स; विविध वयोगटांसाठी 14 मॉडेल्स उपलब्ध

एमपीसी न्यूज- विद्युत दुचाकींच्या क्षेत्रात अग्रगण्य ‘तुनवाल ई-मोटर्स’ घेऊन (Pimpri) आले आहे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुसज्ज,सुरक्षितआणि इको-फ्रेंडली ई-बाईक्स, तेही अत्यंत स्वस्त व परवडणाऱ्या दरात.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, विद्यार्थी, महिला, दिव्यांग अशा विविध घटकांचा सूक्ष्म विचार करून तुनवाल मोटर्सने आधुनिक पद्धतीच्या इलेक्ट्रिक बाईक्स लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत,तेही खिशाला परवडेल अशा किमतींमध्ये.

विविध आकाराच्या 14 प्रकारच्या आकर्षक ई बाईक्स मॉडेल तुनवाल मोटर्सने तयार केल्या आहेत. ग्रामीण भागासह शहरातील विद्यार्थी, व्यावसायिक, प्रोफेशनल्स, महिला, दिव्यांग, डिलेव्हरी बॉय, जेष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा, वेग, आकार यामुळे तुनवाल ई-मोटर्स व्हेईकल्स अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

Pune : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी सामाजिक संस्थानी सक्रीय सहभाग घ्यावा – डॉ. नीलम गोऱ्हे

विविध वयोगटातील व्यक्तींचा विचार करून या बाईक्स तयार करण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त, चालकांच्या सोयीनुसार कमी-जास्त वेग निश्चित करण्याची सुविधा यामध्ये आहे. आकर्षक लूक, इतर ई- बाईक्सच्या तुलनेत स्वस्त आणि परवडणारी किंमत, कमीत कमी विद्युत उर्जेवर जास्तीत जास्त अंतर धावण्याची क्षमता, बॅटरीचे दीर्घकाळ आयुष्य, झीरो साऊंड, आरामदायी बैठक व्यवस्था, पैशांची बचत अशी अनेक वैशिष्टय़ या ई-व्हेईकल्सची आहेत.

तुनवाल ई-मोटर्स’च्या ग्राहकांना बाईक खरेदीवर आकर्षक सवलत व खरेदी संबंधीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच लोन, ईएमआय ची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.ई – बाईक्स च्या क्षेत्रात नव्याने व्यावसाय करू इच्छिना-या लोकांना डीलरशिप देण्यात येत आहे. त्यासाठी बाईक्स च्या क्षेत्रात व्यवसायिक होण्याची संधी तुनवाल ई-मोटर्स’ उपलब्ध करून देत आहे. ग्राहक आणि डीलरशिपसाठी इच्छुक व्यक्तींनी *+91 7559182533, +91 8448448763* या क्रमांकावर संपर्क करावे, अशी माहिती तुनवाल ई-मोटर्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. झुमरमल तुनवाल यांनी दिली.

पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबीशन सेंटर येथे 1,2,3 डिसेंबर 2023 दरम्यान तिसर्‍या *”इंडिया ईव्ही इंटरनॅशनल शो* चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्झिबीशनमध्ये तुनवाल ई-बाईक्स खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी (Pimpri) केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.