Alandi : विक्रेत्यांनी पालिकेच्या यात्रा कर शुल्काशिवाय इतर कोणतेही शुल्क भरु नये – मुख्याधिकारी कैलास केंद्रे

एमपीसी न्यूज – कार्तिकी यात्रा 2023 निमित्ताने आळंदी ( Alandi ) नगरपरिषद हद्दीत विविध विक्रेत्यांना  पालिकेतर्फे जाहीर आवाहन करण्यात करण्यात आले आहे की ,त्यांनी आळंदी नगरपरिषदेची यात्रा कर शुल्काची पावती सोडून इतर कुठल्याही व्यक्तीकडून शुल्काचा भरणा करू नये.

Pimpri : तुनवाल ई-मोटर्स… सर्वात स्वस्त ई बाईक्स; विविध वयोगटांसाठी 14 मॉडेल्स उपलब्ध

कार्तिकी यात्रा 2023 कालावधीत यात्रा कर शुल्काची वसुली करण्या संदर्भात आळंदी नगरपरिषदेकडील नेमून दिलेले कर्मचारी यांना वगळता इतर कोणत्याही व्यक्तींनी यात्रा कर शुल्काची वसुली करताना आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई प्रस्तावित केली  जाणार असल्याची  माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी ( Alandi ) दिली .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.