Pune : एनडीए रस्ता परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज – एनडीए रस्ता परिसरात दहशत ( Pune) माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडाची रवानगी वर्षभरासाठी नागपूर कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील 82 गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई केली असूनगुंडांची रवानगी वेगवेगळ्या कारागृहात करण्यात आली आहे.

Pune : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम (वय 23रा. शांतीबन सोसायटीशिवणेएनडीए रस्ता) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. कदम आणि सथीदारांनी गंभीर गुन्हे केले अहेत. कदमविरुद्ध गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.

त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी तयार केला होता.

पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला. पोलीस आयुक्तांनी प्रस्ताव मंजूर करूनकदम याची नागपूर  मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. कदमला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात ( Pune) आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.