Pune : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे आज (शनिवारी) पुण्यात पहाटे  निधन झाले आहे. त्या 91 वर्षांच्या होत्या.पहाटे झोपेत असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचं निधन झाले होते.  प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

Pune : एनडीए रस्ता परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई

किराणा घराण्याच्या गायिका प्रभा अत्रे यांना पद्मश्री,  पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले होते.प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून त्यांचा लौकिक होता. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवर ही त्यांचे प्रभुत्व आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करत असत. डॉ. प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके (एकाच मंचावरून) प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला (Pune) होता.

https://www.youtube.com/watch?v=PgIBWVfvvUw&t=120s&pp=ygUIbXBjIG5ld3M%3D

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.