Charohali News : सीमेवरील जवानांना राख्या पाठवून वैष्णवी फाउंडेशनतर्फे आगळेवेगळे रक्षाबंधन

एमपीसी न्यूज – रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.

या दिवसाचे औचित्य साधून वैष्णवी फाऊंडेशनतर्फे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सदस्यांच्या हस्ते जवानांना आणि वृक्षांना राखी बांधून व सीमेवरील जवानांना राख्या पाठवून तसेच ज्या महिला भगिनींना भाऊ नाही किंवा कामानिमित्त ज्यांचा भाऊ परगावी आहे अशा महिला भगिनींकडून वैष्णवी फाउंडेशनच्या सदस्यानी राख्या बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे केले.

त्यावेळी बोलताना महिला सदस्यांनी सांगितले की, आयुष्यभर सैनिक रात्रंदिवस आपले संरक्षण करून देशाची सेवा करतात व वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम करते तसेच भावाप्रमाणे आमचं रक्षण करतात,जीवनदान देतात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही आज वैष्णवी फाउंडेशनच्या माध्यमातून रक्षाबंधन साजरे करत आहोत.

यावेळी वैष्णवी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित तापकीर, वाघेश्वर तापकीर, सामाजिक कार्यकर्त्या  कविता बुर्डे, समिंद्रा तापकीर, पुनम तापकीर, दत्तात्रय बुर्डे, मिनाताई बडगुजर, अतुल पठारे आणि फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.