Dighi : 350 टक्के परताव्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाची 51 लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज –  स्टॉक मार्केटमधील 350 टक्के परतावा मिळवून देतो ( Dighi ) म्हणत एका व्यावसायिकाची 51 लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. ही  फसवणूक 15 नोव्हेंबर 2023 ते 17 जानेवारी या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी हरजित सिंह छगाटा (वय 30. रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.31) फिर्याद दिली आहे. यावरून अमित शहा व संबंधित कंपनीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YCMH : वायसीएम रूग्णालयाच्या विभाग प्रमुखपदी डाॅ. अभयचंद्र दादेवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने त्याची रोआर्क कॅपिटल नावाची युएस मध्ये कंपनी असल्याचे सांगितले. स्टॉक मध्ये गुंतवणूक करा 350 टक्के परतावा देऊ असे आमिष दाखवले.
फिर्यादीचा विश्वास संपादन करत त्यांना गुंतवणूक करण्यास सांगून त्यांची 51 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केली. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत ( Dighi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.