YCMH : वायसीएम रूग्णालयाच्या विभाग प्रमुखपदी डाॅ. अभयचंद्र दादेवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती ( YCMH) रूग्णालयाच्या विभागप्रमुखपदी अतिरिक्त आराेग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. अभयचंद्र दादेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे यांच्याकडे पदव्युत्तर पदवी संस्थेशी संबंधित शैक्षणिक कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जारी केला आहे.

Chakan : भाच्याचा मामावर चाकूहल्ला; मामाचा उपचारादरम्यान मृत्यू

महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे रूग्णालयातील दैनंदिन व्यवस्थापन आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम या दाेन्हींचा अतिरिक्त ताण अधिष्ठाता डाॅ. वाबळे यांच्यावर येत हाेता. त्यामुळे रूग्णालयातील आराेग्य सेवांचे कार्यक्षम वितरण सुनिश्तिच करण्यासाठी अतिरिक्त आराेग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. दादेवार आणि डाॅ. वाबळे यांच्याकडे कामकाज विभागून देण्यात आले आहे.

डाॅ. वाबळे यांच्याकडे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने सर्व जबाबदारी देण्यात आली आहे. तर डाॅ. दादेवार यांच्याकडे वायसीएम रूग्णालयातील दैनंदिन कामकाजाचे नियाेजन, संचालन, व्यवस्थापन, औषध, साहित्य व उपकरण खरेदीसह प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत. आयुक्तांनी वायसीएमचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी समतोल साधला आहे. वायसीएम रुग्णालयाचे कामकाज आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत चालणार ( YCMH)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.