Dighi : बालविवाह प्रकरणी पतीसह दोन्ही कुटुंबावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी लग्न करत तिला गर्भवती केल्या प्रकरणी पती सह  दोन्ही बाजूच्या (Dighi) कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 7 फेब्रुवारी 2022 ते आजपर्यंत या कालावधीत दिघी येथे घडला आहे.

Mp Srirang Barne : ‘रसायनीतील हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांचे थकीत वेतन द्या’-श्रीरंग बारणे

याप्रकरणी एका महिलेने दिघी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. यावरून पती पवन वसंत लोहार (वय 24 रा. दिघी) त्याचे आई वडील, तसेच दोन्ही बाजूच्या कुटुंबावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असताना देखील दोन्ही कुटुंबानी पीडितेचा विवाह केला. तसेच तिला गर्भवती केले.

हा सारा प्रकार उघडकीस येताच पती त्याचे आईवडील व मुलीचे आई वडील यांच्यावर बालविवाह तसेच बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नसून दिघी पोलीस पुढील तपास करत (Dighi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.