Dighi : अकाउंटंटकडून पावणेनऊ लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – कंपनीने कंपनीच्या खर्चासाठी दिलेल्या लाखो रुपयांचा हिशोब न ठेवता अपहार केला. याप्रकरणी अकाउंटंट आणि त्याच्या एका साथीदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर वडमुखवाडी च-होली येथे उघडकीस आला.

नितीन दिलीप जाधव (रा. प्रगतीनगर, येरवडा) आणि प्रदीप बाबासाहेब सुतार (रा. कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाबासाहेब ज्ञानदेव फराकटे (वय 58, रा. लोहगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीत सेफ्टी सिक्युरिटी अॅडमिन म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीमध्ये नितीन हा अकाउंटंट म्हणून नोकरी करत होता. कंपनीने कंपनीच्या खर्चासाठी वेळोवेळी त्याच्याकडे 12 लाख 20 हजार 21 रुपये दिले. त्यातील नितीन याने 4 लाख 34 हजार 498 रुपयांचे कंपनीच्या कामासाठी वाटप केले.

उर्वरित 8 लाख 85 हजार 524 रुपयांचा त्याने हिशोब ठेवला नाही. या रकमेचा त्याने अपहार करून त्यातील काही रक्कम स्वतः आणि काही रक्कम प्रदीप याला दिली. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.