Chakan : दिराच्या हॉटेलमध्ये हिस्सा मागत हॉटेलची तोडफोड केल्याप्रकरणी भावजयीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दिराच्या हॉटेलमध्ये भावजयीने हिस्सा मागितला. हिस्सा मागत भावजय, तिचे वडील आणि भावाने हॉटेलमध्ये येऊन तोडफोड करत शिवीगाळ केली. याबाबत भावजयीसह तिच्या वडील आणि भावावर गुन्हा दाखल केला आहे.

भावजय जागृती रविकांत गोरे (रा. चाकण), भास्कर पाटील, कन्हैया भास्कर पाटील (वय 35, दोघे रा. धानोरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत कुमार गोरे (वय 35, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत यांचे चाकण गावात महात्मा फुले चौकात दुर्गा हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये प्रशांत यांच्या भावाची पत्नी जागृती हीचा हिस्सा तिचे वडील भास्कर आणि भाऊ कन्हैया यांनी मागितला. हिस्सा मागत आरोपींनी प्रशांत यांच्या हॉटेलमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला.

जागृतीने हॉटेलमधील एलईडी फोडून 15 हजार रुपयांचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.