Dighi : दुभाजकाला दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना दिघी येथे रविवारी दुपारी घडली.

तिरुमल शंकर पवार (वय 35, रा. देवकर वस्ती, कोणार्क कॅम्प समोर, म्हाडा कॉलनी, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पुणे आळंदी रस्त्यावरून पवार हे आपल्या दुचाकीवरून जात होते. ते दिघीतील मॅगझिन चौकाजवळ आले असता त्यांची दुचाकी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात जखमी झालेल्या पवार यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.