Dighi crime News : अपघातानंतर जखमीच्या नातेवाईकांना मारहाण; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – अपघातानंतर जखमीच्या नातेवाइकांना सहा जणांच्या टोळक्‍याने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी वडमुखवाडी, चऱ्होली येथे घडली.

सुनील वसंतराव तापकीर (वय 52, रा. गणेश मंदीराजवळ, चऱ्होली) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (दि. 21) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तुषार प्रकाश तापकीर (वय 29, रा. भोसरी), प्रतीक प्रकाश तापकीर आणि त्याचे चार मित्र (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधपारी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास वडमुखवाडीकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी प्रतीक याच्या कारने फिर्यादी सुनील तापकीर यांना धडक दिली. यामुळे त्यांच्या पायाला मुका मार लागला.

मात्र अपघातानंतर जखमीवर उपचार तर केला नाहीच. उलट आरोपी तुषार आणि त्याच्या चार साथीदारांनी फिर्यादी सुनील तापकीर, त्यांचा भाऊ विश्‍वास तापकीर, पुतण्या प्रशांत तापकीर आणि अभिजित सूर्यकांत तापकीर यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच ‘तुमच्याकडे बघून घेतो’, अशी धमकी दिली.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.