Dighi crime News : टपरी चालकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – जेवण करण्यासाठी घरी चाललेल्या टपरी चालकावर तीन जणांनी कोयत्याने वार केले. ही घटना तापकीरनगर, देहूफाटा येथे शुक्रवारी (दि. 30) दुपारी घडली.

अक्षय दौंडकर, ओंमकार गाडेकर आणि त्याचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. माधव वैजनाथ कुंडगिर (वय 34, रा. देहूफाटा) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. 30) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधव यांची टपरी आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ते टपरी बंद करून जेवण करण्यासाठी आपल्या घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून तीन आरोपी आले. त्यांनी काहीही कारण नसताना कोयत्याने माधव यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान केले.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.