Dighi Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री साडेबारा वाजता ज्ञानेश्वर पार्क, दिघी येथे घडली.

नूर सय्यद मुबारक अली सय्यद (वय 25, रा. दत्तनगर, ज्ञानेश्वर पार्क, दिघी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुभम सोनवणे, बबलू दंडवते, अक्षय, राक्या (सर्व रा. दिघी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि आरोपी ज्ञानेश्वर पार्क येथे मोकळ्या मैदानात लुडो गेम खेळत होते. 26 ऑगस्ट रोजी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शुभम सोनवणे आणि राक्या यांनी लोखंडी पाईपने, बबल्या याने प्लास्टिक पाईपने तर अक्षय याने दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.