Dighi : केवळ गैरसमजातून फोडला सात लाखांचा काचेचा डमी प्रोजेक्ट; 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – स्वत:च्या जागेत साईटचे (Dighi) ऑफिस बांधले या गैरसमजातून जागा मालक असलेल्या महिलेने व तिच्या साथीदारांनी ऑफिसमध्ये असलेला सात लाख रुपयांचा साईटचा काचेचा प्रोजेक्ट फोडला. या नुकसानी विरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अजित सुरेश पाटील (वय 40 ) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी महिला आरोपी विराट उर्फ मंथन किशोर भिलारे (दोघे राहणार पिंपळे निलख) व त्यांचे आठ ते दहा साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune : खड्डे आणि पावसाळी कामांसाठी विशेष पथके नेमा – दिपक मानकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची डुडुळगाव येथे मंगलम लाईफ पार्क ही बांधकाम साईट सुरू आहे. गुरुवारी( दि.13) ऑफिसमध्ये सर्व सेल्स कामगार असताना आरोपी महिला व तिचे साथीदार तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना तुम्ही आमच्या जागेत परवानगीशिवाय साईटचे ऑफिस का बांधले? अशी विचारणा केली.

यावेळी हा केवळ गैरसमज आहे असे सांगितले असताही (Dighi) आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी केली, तसेच ऑफिसमध्ये असणारा सात लाख रुपयांचा साईटचा काचेचा डमी प्रोजेक्ट फोडून इतर साहित्याचीही तोडफोड केली. या नुकसानी विरोधात दिघी पोलीस ठाण्यात सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.