Dighi : मोबाईलचा इंटरनेट अॅक्सेस घेऊन महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटशी छेडछाड
एमपीसी न्यूज – महिलेच्या दोन मोबाईल फोनचा इंटरनेट अॅक्सेस घेऊन अज्ञाताने ( Dighi ) त्यांचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले. तसेच सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटची छेडछाड केली. हा प्रकार 18 मे ते सहा ऑगस्ट या कालावधीत दिघी येथे घडला.
याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Khadki : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोन मोबाईल फोनचा अज्ञाताने इंटरनेटद्वारे ॲक्सेस घेतला. त्यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईल मधील फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले. फिर्यादी यांचे सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंटचा पासवर्ड बदलून त्याचा अॅक्सेस घेतला. फेसबुक खात्याचा आरोपीने वापर केला. त्यावर व्हेरिफिकेशनसाठी एक मोबाईल नंबर ॲड करून फिर्यादी यांचे जी मेलच्या खात्याचा पासवर्ड देखील बदलला.
तसेच जी मेल खाते दुसऱ्या ठिकाणी लॉगिन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत ( Dighi ) आहेत.